बहुआयामी व्यक्तीमत्व :डॉ. प्रदीप पवार
डॉ. प्रदीप पठार... नाशिकच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वश्रुत नाव. वैद्यकीय, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रात उठबस असलेल्या डॉ. प्रदीप पवार यांची वेगळी ओळख म्हणजे ते 'मिशन मॅन' म्हणूनही सर्वपरिचित आहेत. गरजू आणि वंचितांना मदतीचा हात देणाऱ्या डॉ. पवार यांना सतत लोकांमध्ये जाऊन, त्यांच्याशी संवाद साधून स्वतःला काळासोबत ठेवण्याचा जणू छंद आहे. लोकांच्या जीवनात कशा पद्धतीने बदल आणता येईल. यासाठी त्यांनी शोधक दृष्टी भिरभिरत असते. त्यामधून ते आपल्या प्रयत्नांना पैलू पाडण्यासाठी झोकून देतात.ही एका एका अशा माणसाची गोष्ट आहे जो स्वतः मन जाणतो आणि हृदयस्थ पाठलाग करतो. बाल्यावस्थेत असतानाच प्रदीप यांनी डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. एवढेच नाही तर ज्या बिशेष शाखेत करियर करायचे, तिची निवड देखील त्यांनी त्याचवेळी केली होती, हे विशेष. प्रदीप हे मूळ नाशिकच्या कळवण तालुक्यातील मानूर गावचे. त्यांचे पिता मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत प्राचार्य पदावर कार्यरत होते. गणित विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या ज्ञानदानामुळे त्यांचे जीवन आणखी समृद्ध झाले. "माझ्या वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे माझे शिक्षण वेगवेगळ्या जागी झाले. मात्र, त्यातील अधिक प्रमाणात ज्ञानार्जन केले ते दिंडोरीत. दहावी आणि बारावी मी नाशिकमध्ये पूर्ण केले."
डॉ. प्रदीप सांगतात, बाराबी परिक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या डॉ. प्रदीप यांना एमबीबीएससाठी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथेच त्यांनी डीजीओचा अध्याय पूर्ण केला. "माझ्या काकांना मी स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करताना बघत होतो. ते बघून मला वाटले की केवळ स्त्रीरोगतज्ञच डॉक्टर असू शकतो आणि मी ही शाखा निवडण्याचा निर्धार केला." प्रदीप म्हणाले, डीजीओ पूर्ण केल्यानंतर डॉ. प्रदीप यांनी डॉ. मेहरू हान्सोशिवा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यारंभ केला. डॉ. हान्सोशिया मुंबईच्या नवरोजी बाडिया मॅटनिर्टी हॉस्पिटलमध्ये प्रथमच इन्फर्टिलिटी क्लिनिक सुरू केले होते. "मी डॉ. हान्सोशिया यांच्या सोबत सुमारे तीन बर्ष काम केले. तिथेअनुभव संपन्नता प्राप्त करण्याबरोबरच मी डिप्लोमा इन फैमिली प्लॅनिंग देखील पूर्ण केला. डॉ. प्रदीप म्हणाले, प्रदीप हे इंडिया कॉलेज ऑफ ऑब्स्ट्रेशियन्स अॅण्ड गायनॅकॉलॉजिस्टचे डिप्लोमॅट आहेत. त्यांना कॉलेज ऑफ मॅटर्नल अॅण्ड चाईल्ड हेल्थची फेलोशिप देखील प्राप्त आहे.
विविध कौशल्ये आणि ज्ञानाच्या पैलूंनी युक्त डॉ. प्रदीप यंनी व्यावसायिक बस्तान कर्मभूमीत अर्थात नाशिकमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी त्यांनी जिल्हा रुग्णालयात काम केले. आपले स्वीरोगतज्ञ काका डॉ. ए. के. पवार यांच्याकडून त्यांना मुख्यत्वे प्रेरणा लाभली. पुढे त्यांनी स्वतःची प्रॅक्टीस सुरू केली. लोकांना पुरेशा न मिळू शकणाऱ्या वैद्यकीय सुविधा विशेषतः आदिवासी बहुल भागात असलेल्या त्या संदर्भातील त्रुटी डॉ. प्रदीप यांना खासगी प्रॅक्टीस करण्याकडे घेऊन गेल्या. लोकांनी खेड्यातून उपचारासाठी शहरात यावे, ही भावना न ठेवता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोचत ग्रामीण भाग पिंजून काढत वैद्यकीय सेबा सुविधा देण्याचा धडाका लावला, त्यासाठी त्यांनी अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, स्त्रीरोगाशी संबंधित तपासण्या आणि इतर वैद्यकीय सुविधा देऊन त्यांनी आदिवासींचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला.
नाशकात बिदुला नर्सिंग होमच्या रुपाने उत्तण महाराष्ट्रातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी केंद्र आयव्हीएफ सुरू करण्याचा बहुमान डॉ. प्रदीप यांना जातो. या केंद्राद्वारे त्यांनी अपत्यप्राप्तीचा अधिकार देऊन असंख्य परिवारांच्या चेहऱ्यावर हास्य करण्यासाठीही डॉ. प्रदीप यांनी मोलाची भूमिका बजावली. शेतकरी परिवारातील पार्श्वभूमीमुळे डॉ. प्रदीप यांना शेतकऱ्यांच्या समस्या व व्यथा अवगत होत्या, त्यासाठीच शासनाच्या विविध योजना व त्यांचे स्वरुप याबाबत ते शेतकऱ्यांना माहिती देऊन लागले. एक प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांना शिक्षित करण्याचा यज्ञ आरंभला. सोबतच त्यांना वैद्यकीय सहित्य मोफत देण्याचे औदार्यही डॉ. प्रदीप यांनी दाखवले.
डॉ. प्रदीप यांच्या कर्तृत्वाचा अजून एक अध्याय म्हणजे त्यांनी विचूर बाईन पार्कमध्ये वायनरीची मुहूर्तमेढ रोवली. "कुटुंबाचे एक मार्गदर्शक आणि कृषीतज्ञ माधवराव मोरे यांनी वायनरी उभारण्यसाठी पूर्ण सहकार्य केले. आम्ही आधीच द्राक्षोत्पादन शेतीत होतो. आम्ही प्रल्हाद खडांगळे यांच्याशी समन्वय साधून बाईन मेकींगच्चे धोरण निश्चित केले. त्यामुळे द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांचा फायदा झाला. डॉ. प्रदीप म्हणाले, त्यांच्या वायनरी युनिटमध्ये पाच शेतकऱ्यांचा समावेश आहे.
सुदृढ सामाजिक संबंधामुळे प्रदीप ओघाने राजकारणात ओढले गेले. "मला राज ठाकरे माहिती होते. गरजूंना मदत करण्याची माझी सवयही त्यांना माहित होते. म्हणून त्यांनी मला सक्रीय राजकारणात येण्याची सूचना केली. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय व्यासपीठ उत्तम असल्याचेही त्यांनी मला पटवून दिले. प्रथम मी थोडा गोंधळलेला होतो. राजकारणात शिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांची गरज असल्याचे जाणून मी राजकारणात सक्रीय झालो. मी राज ठाकरे यांच्या 'मनसे' पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले." डॉ. प्रदीप यांनी सांगितले. पक्षीय काम करतानाही त्यांना समाधान वाटले कारण ते लोकांसाठी होते. मात्र या काळात प्रॅक्टीसवर परिणाम झाल्याने त्यांनी सक्रीय राजकारणातून 'ब्रेक' घेतला.
आपल्या मातेच्या शिकवणीचा आदर म्हणून डॉ. प्रदीप यांनी प्रारंभापासून दरगुरुवारी आपल्या बिदुला नर्सिंग होममध्ये रुग्णांना मोफत सेवा देण्याचा पायंडा पाडला. जो आजतागायत अव्याहत सुरू आहे. यासाठीं त्यांना सौभाग्यवती सौ. सुवर्णा यांची साथ लाभते. डॉ. प्रदीप बांना सिद्धार्थ हा पुत्र तर आर्या ही कन्या आहे. डॉ. प्रदीप पवार यांना उद्याच्या उषःकालाची अपेक्षा आहे. ऑपरेटिव लेप्रोस्कोपी आणि हिस्टेरोस्कोपी या गायनॅकॉलॉजीमधील नव्या संकल्पना आहेत. डॉ. प्रदीप या क्षेत्रात कार्य करू इच्छितात. याद्वारे लोकांना आरोग्यसेवेचा नवा पैलू प्रदान करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. डॉक्टर्ससाठी वैद्यकीय शिक्षणातील सातत्य अत्यंत महत्वाचे आहे. त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री ठेवायची आहे. त्यासाठीची सर्व साधन सामुग्री त्यांनी आपल्या रुग्णालयात उभारली आहे. अशा या. मानवतावाद्याला समाजाला सर्वोत्तमते देण्याची आस आहे. "मला वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे आहे आणि उत्तम उपचार पद्धतीचा माझ्या परिसरातील लोकांना लाभकरून द्यायचा आहे."